By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथील फातिमा बागवान या महिलेने गरिबीला कंटाळून 3 मुलांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, काल रविवारी फातिमाचे पतीबरोबर कडाक्याचे भांडण झाले. शेवटी फातिमाचा पती रागाने घराबाहेर गेला. त्यानंतर नैराशाने ग्रासलेल्या फातिमाने तीन मुलांची फासाला लटकवून हत्या केली आणि स्वत:लाही गळफास लावून घेतला. राग शांत होताच फातिमाचा पती घरी आला. बराच वेळ दार वाजवूनही कुणीच प्रतिसाद देत नसल्याने त्याने पोलिसांना बोलावून दार उघडल आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झाल्याचे त्याला बघायला मिळालं. संपूर्ण कुटुंब फासावर लटकलेल पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार गरिबीला कंटाळून नैराश्यामुळे फातिमाने हा टोकाचा निर्णय घेतला. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर या घटनेतील सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
घाटकोपरमध्ये साईबाबा गार्डन येथे नितेश सावंत या शिवसैनिकाची त्याच्या ....
अधिक वाचा