ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपा नेत्याच्या घरी सापडला शस्त्रांचा खजिना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपा नेत्याच्या घरी सापडला शस्त्रांचा खजिना

शहर : देश

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलीस यंत्रणांही अनेक ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यातच मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे नेते संजय यादव यांच्या घरावर मध्य प्रदेशपोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांकडून संजय यादव यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये संजय यादव यांच्या घरातून 13 पिस्तुल, 17 देशी बॉम्ब आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी आरोपी संजय यादवविरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्याचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

संजय यादवविरोधात 47 गुन्हे

सेंधवा शहरात संजय यादव आणि गोपाळ जोशी यांच्या दोन टोळ्या सक्रीय आहेत. त्यांच्याविरोधात खंडणी, मारहाण, हत्या, धमकावणे यासारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संजय यादवच्या विरोधात 47 गुन्हे तर गोपाळ जोशीवर 30 गुन्ह्यांची नोंद आहे अशी माहिती एसपी यांगचेन भूटिया यांनी दिली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गॅंग एक मोठं षडयंत्र आखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजूनही अनेक नावे यात समोर येतील त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 करोड रुपयांची दारु, ड्रग्स, बनावटे वाहने आणि हत्यारे जप्त केली आहेत.

मागे

सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी सहायक अभियंता एस.एफ. काकुळतेला अटक
सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी सहायक अभियंता एस.एफ. काकुळतेला अटक

सीएसएमटी स्थानकाजवळील पूल दुर्घटनेत 6 निष्पापांचा नाहक बळी गेला. या दुर्घट....

अधिक वाचा

पुढे  

बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) परिसरात एका विद्यार्थ्याची  गोळ्या झाडून हत्या ....

Read more