By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 04:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बारबालेवर पैसे उडविण्यासाठी हवे असल्याने एका तरूणाने आपल्या बिझनेस पार्टनरची हत्या केल्याचे उघड झाले आहे. बारबालेसोबत अनैतिक संबंध असल्याने व कर्जबाजारी झाल्याने पैशासाठी भागीदाराची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. मितेश सोनी असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याची हत्या हेमंत सोनी याने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेमंत सोनी आणि मितेश सोनी यांनी मालाडमध्ये दागिन्याचा व्यवसाय सुरू केला होता. हे दोघेही राजस्थानमधील आहेत. दरम्यानच्या काळात मितेश याचे साकीनाका भागातील एका बारबालेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मितेशचे व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने हेमंतने त्याच्यासोबतची भागीदारी तोडून टाकली. तसेच मितेशच्या या भानगडीची कल्पना त्याच्या पत्नीलाही आली. त्यामुळे मितेशची पत्नी त्याला सोडून राजस्थानला निघून गेली. यानंतर तर मितेश या बारबालेत आणखीच वाहत गेला.
दरम्यान, मितेशचे बारबालेवर पैसे उडविणे व इतर कारणांमुळे कर्जबाजारी झाला. मितेशने सख्या भाऊ व इतरांकडून लाखो रूपये घेतले पण ते फेडू शकला नाही. अखेर त्याला व्यवसाय बंद करावा लागला.
दुसरीकडे, हेमंत सोनीचा व्यवसाय वाढत चालला होता. त्याला नुकतीच दागिन्यांची एक मोठी ऑर्डर मिळाली होती. आपली पत्नी याच्यामुळेच सोडून गेली. व्यवसाय पण बंद करावा लागला. या रागातून मितेशने हेमंतचा काटा काढण्याचे ठरवले. शिवाय त्याला मारल्यास त्याचा पैसा व दागिने मिळतील या लालसेतून त्याची हत्या मालाडमधील दागिन्याच्या कारखान्यात केली. तसेच लाखो रूपयांचे दागिनी व रोख साडेपाच लाख रूपये घेऊन पोबारा केला. चार दिवसापूर्वी मितेशचा मृतदेह मालाडमधील त्याच्या कारखान्यात आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता हेमंत सोनीने हत्या केल्याचे स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी हेमंत सोनीला राजस्थानातून ताब्यात घेत अटक केली आहे.
विक्रोळीत राहणार्या रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाइट पो....
अधिक वाचा