By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 05, 2019 11:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत काहीही विकलं जातं असं म्हटलं जातं. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण हे काहीही नागरिकांच्या जीवावर बेतलं असतं. आठवी नापास डॉक्टर मुंबईत दवाखाना थाटून बसले आहेत. अशाच बोगस डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या डॉक्टरांकडे तर वैद्यकीय शिक्षण सोडा साधं पूर्ण शिक्षण ही झालेलं नाही. अशाप्रकारे मुंबईमध्ये विविध भागांमध्ये बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची तक्रार मुंबईच्या पोलिसांकडे दाखल झाली होती.
मुंबई पोलिसांनी कुर्ला, डोंगरी, धारावी ,अँटॉप हिल अशा विविध ठिकाणी छापा मारून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. यातील कुर्ल्याच्या दवाखान्यातला हा डॉक्टर दहावी नापास आहे. तर एक डॉक्टर हा तर शाळेतही गेला नव्हता अशी धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे.
मुंबईमध्ये याआधी ही काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी धाड टाकत बोगस डॉक्टरांना अटक केली होती. अशा प्रकारे कोणतीही डिग्री नसताना विश्वासाने आलेल्या रुग्णांची हे डॉक्टर फसवणूक करत होते. यामुळे मुंबई सारख्या शहरात पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलं आहे.
नागरिकांनी ही अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याची गरज आहे. कोणताही डॉक्टर संशयास्पद दिसल्याची त्याची माहिती पोलिसांनी देणं आवश्यक आहे.
व्हिडिओ गेम मागं मुलं वेडी झाली आहेत, यात ते त्यांच सर्वस्व गमावून बसत आहेत ....
अधिक वाचा