By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तलासरी येथे 15 वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली. मृत मुलगी 9 वीच्या वर्गात शिकत होती. तिच्या कुटुंबीयांनी ऑक्टोबरमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार समता नगर पोलिस ठाण्यात दिली होती. ती पोयसरमधील जनिया कम्पाऊंड येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबरला मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाला. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुरुवातीला मृतदेह मिळाल्यानंतर जळलेला मृतदेहाची ओळख पटवणे कठिण गेले. समता नगर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीने ओळख पटवली. दरम्यान, मुलीच्या आईने आपल्या बेपत्ता मुलीचाच मृतदेह आहे, असा दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे फिरवली. मुलीच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना तिच्या घराजवळ राहणाऱ्या 24 वर्षीय मुलावर संशय आला. मात्र, तो मुलगा फरार होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा आधार घेत त्याला 11 नोव्हेंबरला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने सांगितलं, “माझं तिच्यावर प्रेम होतं. मात्र, ती ऐकतच नव्हती. मी प्रयत्नपूर्वक 1 ऑक्टोबरला रात्री तिला घरी बोलावले आणि हत्या केली. मृतदेह नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरुन रात्रीतून तलासरी येथे नेला आणि तेथे पेट्रोल टाकून जाळला. न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार....
अधिक वाचा