ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2020 10:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

शहर : अहमदनगर

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे या सोमवारी (30 नोव्हेंबर) आपला मुलगा आणि आईसोबत पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखारांनी तीक्ष्ण शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले.  त्यांना त्वरीत अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.

रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मात्र नंतर त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या हत्येने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

 

मागे

अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रियकराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला
अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रियकराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

माटुंगा पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला आपल्या प्रियकर....

अधिक वाचा

पुढे  

NCB Officer Suspended|आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित
NCB Officer Suspended|आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना सहकार्य, तसेच तपासादरम्यान ....

Read more