ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गुजरातमध्ये नववधूला नवर्‍याने केली मारहाण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गुजरातमध्ये नववधूला नवर्‍याने केली मारहाण

शहर : ahmedabad

लग्नाच्या पहिल्या रात्री शरीरिक संबंध करायला नकार दिला म्हणून नववधूला नवर्‍याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पत्नी प्रियंका तिवारीने पती धर्मेंद्र शर्मा विरोधात कृष्णनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
लग्नातले विधी आणि स्वागत समारंभ यामध्ये थकून गेल्यामुळे मी झोपले होते. धर्मेंद्र माझ्या खोलीत आले. त्यांनी शरीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. पण मी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या धर्मेंद्रने आपल्याला अपशब्द सुनावले. माझे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा आरोप केला असे प्रियंकाने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दुसर्‍या दिवशी धर्मेंद्र माझ्या आई-वडिलांशी बोलला त्यानंतर त्याने मला मारहाण केली. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून सासरे आणि अन्य नातेवाईक मदतीसाठी धावून आले असे प्रियंकाने म्हटले आहे. घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलमातंर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मागे

’नक्षली हल्ल्याचं राजकारण करू नका’ रामदास आठवले 
’नक्षली हल्ल्याचं राजकारण करू नका’ रामदास आठवले 

काल झालेल्या गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात 15 पोलीस जवान शहीद झाले. नक्ष....

अधिक वाचा

पुढे  

बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा
बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा

काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये चकमक सुरू आहे. यावेळी लष्करानं 2 ते 3 दहशतव....

Read more