ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नारायण साईला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नारायण साईला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड

शहर : surat

बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर आज कोर्टाने नारायण साईला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच लाखाचा दंड देखील ठोठावला आहे. काही दिवसांपूर्वीच बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला कोर्टाने दोषी ठरवलं होतं. सूरतच्या सेशस कोर्टाने शुक्रवारी नारायण साईला दोषी ठरवलं होतं. नारायण साईला सरकार पक्षाने जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने वर्षाची शिक्षा देण्याची मागणी केली होती.सूरतच्या राहणाऱ्या बहिणींनी नारायण साईंवर बलात्काराचा आरोप केला होता. कोर्टाने यानंतर नारायण साईला दोषी ठरवलं. पोलिसांनी पीडित बहिणींचा आरोप आणि काही पुरावे गोळा केल्यानंतर नारायण साई विरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण साई आणि आसाराम बापू यांच्या विरोधात करण्यात आलेला आरोप ११ वर्ष जुना आहे. पीडितेच्या छोट्या बहिणीने पुरावे दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. तर पीडितेच्या मोठ्या बहिणीने आसाराम बापुच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

आसाराम बापुविरोधात गांधीनगर कोर्टात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. नारायण साईच्या विरोधात कोर्टाने आतापर्यंत ५३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. नारायण साईवर जेलमध्ये असताना पोलिसाला १३ कोटींची लाच देण्याचा देखील आरोप आहे.

 

मागे

केरळमध्ये आत्मघाती हल्ल्याची होती तयारी, आयसीसचा म्होरक्या ताब्यात
केरळमध्ये आत्मघाती हल्ल्याची होती तयारी, आयसीसचा म्होरक्या ताब्यात

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसीसच्या केरळमधल्या कारवायांचा म्होरक्य....

अधिक वाचा

पुढे  

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना घ....

Read more