By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : गडचिरोली
राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भीषण भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे 15 जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोलीचे पोलीस आधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासह नक्षलवादी विरोधी पथकाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनतर शहीद जवानांचे पार्थिव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आणले गेले. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवानांचे पार्थिव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आणताच जवानांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्षलवाद्यांनी छत्तीसगढमधील सामान्य ग्रामस्थांवर काल रात्री सुकमा जिल�....
अधिक वाचा