ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी

शहर : गडचिरोली

नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सरकार विरोधात बॅनरबाजी केली आहे. गडचिरोलीत दादापूर गावासह ठिक ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावून सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.  गेल्या वर्षी कसनासूरच्या जंगलात शिघ्र कृती दलाने केलेल्या कारवाईत 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवल्याचे बोलले जात आहे. त्यानिमित्त 22 ते 28 एप्रिलदरम्यान नक्षलवाद्यांनी शहीद सप्ताहाचे आयोजन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय हिंदूराष्ट्र निर्मितीचे स्वप्न उद्ध्वस्त करून नव जनवादी देश निर्माण करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी बॅनर लावून केले आहे. तसेच जल-जंगल-जमीनीवर जनतेचा अधिकार असून त्यासाठी बलीदान देण्याचेही आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.
 

मागे

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचें....

अधिक वाचा

पुढे  

नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार
नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार

नक्षलवाद्यांनी छत्तीसगढमधील सामान्य ग्रामस्थांवर  काल रात्री सुकमा जिल....

Read more