By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : गडचिरोली
गडचिरोली – कुख्यात नक्षलवादी कॉम्रेड रामन्ना याच्यावर ओडीसा सरकारने १ कोटी ४० लाख रुपये बक्षीस लावले होते. मात्र रामन्नाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. विजापूर जिल्ह्यातील पामेड आणि बासागुडा या गावातल्या जंगलात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. रामन्नाच्या मृत्यूची माहिती मिळविण्यासाठी बरेच पुरावे सापडले आहेत. मात्र पोलीस अजूनही या संदर्भात अधिक माहिती घेत आहेत.
रामन्ना नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. गेल्या काही दशकांपासून बस्तर भागातील मोठ्या कारवायांचा तो मास्टर माइंड होता. २०१० मध्ये ताडमेटला येथे 76 सैनिकांचा मृत्यू आणि २०११ मध्ये दरभा खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला यात त्याचा समावेश होता. याच हल्ल्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शहीद झाले होते. रामन्ना तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. छत्तीसगड-महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्ये मिळून त्याच्यावर १ कोटी ४० लाख रुपयांचे बक्षीस होते.
दरम्यान, त्याची पत्नी सावित्री उर्फ सोधी हिडमे ही दक्षिण बस्तरमधील नक्षली नेत्यांपैकी एक प्रमुख आहे. रामन्नाचा मुलगा रणजित आपल्या आईच्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून सक्रिय आहे. रामन्ना हा मध्य भारतातील नक्षलवादी घटनांचा मुख्य रणनीतिकार मानला जायचा. रामन्ना यांच्या निधनाने बस्तर भागातील नक्षली चळवळ दुर्बल होईल अशी पोलीस अधिकाऱ्यांची अटकळ आहे.
नाशिक – शिर्डीमधून वर्षभरात तब्बल 88 भाविक महिला आणि तरुण ग....
अधिक वाचा