ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपा आमदाराची हत्या करणारा नक्षली ठार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपा आमदाराची हत्या करणारा नक्षली ठार

शहर : गडचिरोली

छत्तीसगडच्या दंतेवाडामधील जंगलामध्ये भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्यासह वाहन चालक आणि तीन जवानांची भुसुरुंग स्फोटाद्वारे हत्या करणार्‍या नक्षलवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. 
गेल्या महिन्यात भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबारही केला होता. 9 एप्रिलला हा हल्ला झाला होता. या मागील सुत्रधार मुया याच्यावर 8 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या नक्षलवाद्यांवरील कारवाईमध्ये त्याला ठार करण्यात आले. 
दंतेवाडाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी मुया ठार झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री उशिरा जिल्हा राखीव दलाला मडकामीरास जंगलामध्ये नक्षली लपल्याची खबर मिळाली होती. यानुसार शोध घेताना नक्षल्यांशी चकमक उडाली. यामध्ये मुया मारला गेला. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून घटनास्थळावर रायफल आणि काडतुसे मिळाली आहेत. मुया हा नक्षलवादी कारवायांमध्ये बर्‍याच काळापासून सक्रीय होता. शामगीरी हल्ल्यासह तो चोलनार येथील बॉम्बहल्ल्यात सहभागी होता. यामध्ये किरंदुल ठाण्यातील जवान शहीद झाले होते.
आ. मांडवी व भाजपचे स्थानिक नेते प्रचारासाठी जात असताना नक्षल्यांनी वाहनांपाशी स्फोट घडवून आणला. दंतेवाडा हा भाग बस्तर मतदारसंघात येतो. तिथे पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान होणार होते, त्यात बदल करण्यात आला नाही.

मागे

चिटफंड घोटाळा प्रकरणीः राजीव कुमार यांच्या कस्टडीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला
चिटफंड घोटाळा प्रकरणीः राजीव कुमार यांच्या कस्टडीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसा....

अधिक वाचा

पुढे  

’नक्षली हल्ल्याचं राजकारण करू नका’ रामदास आठवले 
’नक्षली हल्ल्याचं राजकारण करू नका’ रामदास आठवले 

काल झालेल्या गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात 15 पोलीस जवान शहीद झाले. नक्ष....

Read more