By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली- तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. लोकांना सत्य समजलं पाहिजे. त्यामुळे हैद्राबाद एन्काऊंटरप्रकरणी चौकशी होणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. परंतु लोकांना सत्य समजलं पाहिजे आणि त्यासाठी हैद्राबाद एन्काऊंटरप्रकरणी चौकशी होणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
बुलढाणा – खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरीमधील मानसिकरित्या कमजोर असलेल....
अधिक वाचा