By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
भारतीय उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा माजी प्रियकर नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. एका जपानी न्यायालयानं हा आदेश दिलाय. नेस वाडिया भारतातल्या सर्वात श्रीमंत अशा एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्ती आहे. जपानमध्ये स्किईंगच्या सुट्टी दरम्यान ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर हा निर्णय सुनावण्यात आलाय.
का झाली अटक?
मार्चच्या सुरुवातीला उत्तर जपानी बेट होक्काइडो के न्यू चिटोज विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती. जपानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, न्यू चिटोजच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान नेस वाडिया यांच्याकडून २५ ग्रॅम नशायुक्त पदार्थ जप्त केले होते. 'स्निफर डॉग'ची या तपासणीसाठी मदत झाली होती. जपानमध्ये अंमली पदार्थांविरोधात कडक कायदे आहेत आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जाते.
नेस वाडिया हे २८३ वर्ष जुन्या वाडिया समूहाचे एकमेव वारस आहेत. ४७ वर्षीय नेस वाडिया हे भारताचे प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट टीमचे ते सह-मालक आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार, नेस वाडिया हे सात अब्ज किंमतीच्या संपत्तीचे मालक आहेत. वाडिया समूहात बिस्कीट कंपनी 'ब्रिटानिया इंडस्ट्रीज'पासून विमान कंपनी 'गोएअर' अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
याअगोदर नेस वाडिया हे अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे प्रकाशझोतात आले होते. ३० मे २०१४ रोजी पंजाब किंग्स एलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान प्रिती झिंटाला नेस वाडीयाने तिकीट वाटपावरुन आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सगळ्यांसमोर प्रितीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीतीने केला होता. परंतु, काही महिन्यांनी त्यांच्यातील हे भांडण संपुष्टात आलं होतं.
पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी तसंच इंडियन मुजाहिद्द....
अधिक वाचा