By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अंमली पदार्थांची तस्करी करणार्या ७ आरोपींना दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींच्या पोटात तब्बल १७७ ड्रग्जचे कॅप्सूल काढण्यासाठी त्यांना १० डझन केळी खाण्यास दिली गेली.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी अफगाणिस्तान ते थेट दिल्लीपर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे नियंत्रण विभागाला एका गुप्त यंत्रणेच्या माहितीच्या आधारे इंदिरा गांधी विमानतळावर पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी ते संशयित आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्यांना घेरले आणि त्यांची झडती घेतली. मात्र त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. शेवटी त्या आरोपींचे स्कॅनिंग आणि एक्सरे काढण्यात आल्याने तब्बल ७ जणांच्या पोटात कॅप्सूल आढळले. या सर्व कॅप्सूल नियंत्रण विभागाने जप्त केली आहेत. तपासा दरम्यान संशयास्पद असलेल्या अन्य २ व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
श्रीनगर : दहशतवाद्यांना आपल्याच देशातील काही पोलीस अधिकारी मदत....
अधिक वाचा