ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुरुंगाला दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश,16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुरुंगाला दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश,16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी ?

शहर : मुंबई

दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील नराधमांना कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, त्या सर्वांना येत्या एका आठवड्यात फाशी दिली जाऊ शकते. बिहारच्या बक्सर तुरुंग प्रशासनाला याच आठवड्याच्या शेवटी 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिहारचे बक्सर तुरुंग फाशीचे दोरखंड तयार करण्यात सर्वात एक्सपर्ट जेल मानली जाते. फास बनवण्याचे निर्देश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आले होते. परंतु, ही मागणी कुणाला फाशी देण्यासाठी आली याची अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर अमानवीय अत्याचार करण्यात आले होते. तर फाशीचे दोरखंड 14 डिसेंबर पर्यंत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, निर्भयाच्या दोषींना 16 डिसेंबर रोजीच फाशी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बक्सर तुरुंग अधीक्षक विजय कुमार अरोरा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की त्यांना "14 डिसेंबर पर्यंत 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश दिले. आम्हाला ते कशासाठी बनवले जातील हे सांगण्यात आलेले नाही." विशेष म्हणजे, संसदेवर हल्ल्याचा आरोपी अफजल गुरूला जेव्हा फाशी देण्यात आली तो दोरखंड याच ठिकाणी तयार करण्यात आला होता. 2016-17 मध्ये पतियाळा तुरुंगाकडून हे आदेश मिळाले होते. त्यावेळी सुद्धा ते कुणासाठी मागवण्यात आले याची माहिती देण्यात आली नव्हती.

दोरखंड कसे तयार होतात?

तुरुंग अधीक्षकांनी सांगितले, की बक्सर जेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दोरखंड तयार केले जात आहेत. फाशी देण्यासाठी एक दोरखंड 7200 धाग्यांपासून बनवले जाते. हे तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. त्यावर 5 ते 6 लोकांना काम करावे लागते. या कामासाठी कैद्यांनाच जबाबदारी दिली जाते. दोरखंड तयार करण्यासाठी हातासह थोडाफार मशीनचा देखील वापर होतो. गेल्यावेळी जेव्हा दोरखंड तयार करण्यात आले तेव्हा त्यांची प्रत्येकी किंमत 1725 रुपये होती. आता मात्र, त्या दोरखंडांना लावल्या जाणाऱ्या पितळाच्या बुशची आणि इतर किमती वाढल्याने महाग होऊ शकतात अशी माहिती अधीक्षकांनी दिली आहे.

16 डिसेंबर 2012 च्या काळरात्री निर्भया आपल्या मित्रासोबत घरी जात होती. त्याचवेळी बसमध्ये असलेल्या 6 नराधमांनी मित्राला मारहाण करून तिच्यावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. अत्याचार इतका पाशवी होता की तिच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. क्रूरकर्मांनी तिच्या गुप्तांगांमध्ये लोखंडी सळ्या खोपल्या होत्या. काही दिवस तिच्यावर उपचार देखील झाले. परंतु, एकूणच तिची अवस्था पाहता तिला वाचवणे अशक्य होते. सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झाला. यातील एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. दुसरा अल्पवीय असल्याने त्याची तीन वर्षांनंतर सुटका झाली. तर चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. यातील 3 दोषींनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळून लावण्यात आली. यापूर्वी दिल्ली सरकारने सुद्धा दोषींचा दयेचा अर्ज नकारला. आता राष्ट्रपतींचा निर्णय समोर येताच नराधमांच्या फाशीचा मार्ग मोकळा होणार आहे.

मागे

शिर्डीमध्ये आईसह तीन मुलांना विषबाधा; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू
शिर्डीमध्ये आईसह तीन मुलांना विषबाधा; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

अहमदनगर – शिर्डी य़ेथील संगमनेरातील आंबेडकरनगरमध्ये विषबाधेमुळे लहान बह....

अधिक वाचा

पुढे  

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबरपासून सरकार विरोधात मौनव्रत आंदोलन...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबरपासून सरकार विरोधात मौनव्रत आंदोलन...

अहमदनगर - देशात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही या घटनेविरुद....

Read more