ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भयाला न्याय – तिहार जेलमध्ये चारही क्रूरकर्म्यांना अशी देणार फाशी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भयाला न्याय – तिहार जेलमध्ये चारही क्रूरकर्म्यांना अशी देणार फाशी

शहर : देश

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघाही गुन्हेगारांना पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्याची तयारी तिहार जेल प्रशासनानं केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुसार, मृत्यू समोर दिसत असल्यानं चारही गुन्हेगार अस्वस्थ आहेत. मृत्युच्या भीतीनं क्रुरकर्मा आपआपल्या कोठडीत रडत आहेत. जेल प्रशासनाकडून चारही दोषींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

चारही दोषींवर सातत्यानं लक्ष ठेवावं, एक क्षण देखील लक्ष विचलित होऊ देऊ नका, असे निर्देशच सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कारण आत्महत्येचं नाटक करून फाशी टाळण्याची चाल चौघेजण खेळू शकतात. त्यामुळे पहाटे फासावर लटकवण्यापर्यंत त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे.

चौघांना फाशी देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तिहार जेलच्या महासंचालकांनी संध्याकाळी उच्चस्तरिय बैठक घेतली.

फाशी दिल्यानंतर असं होणार पोस्टमार्टम

चारही दोषींना पहाटे फाशी दिल्यानंतर चौघांचं शव तिहार जेल प्रशासनाकडून दीनदयाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. पोस्टमार्टम म्यॅन्युअलनुसार साधारण सकाळी ८ वाजता शवविच्छेदन प्रक्रिया सुरु होईल.

शवविच्छेदनानंतर शव कुठे नेणार?

शवविच्छेदनानंतर चौघांचे शव ताब्यात घेणार की नाही याबाबत चौघांच्या कुटुंबीयांनी अजूनही काही सांगितलेलं नाही. जर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले नाही तर पोलीस प्रशासन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करेल. जेल मॅन्युअलनुसार तशीच प्रक्रिया केली जाईल.

चारही आरोपींनी अजून त्यांची शेवटची इच्छा सांगितलेली नाही. पण फाशी दिल्यानंतर या चौघांनी जेलमध्ये श्रम करून जो पैसा कमवला आहे, ती रक्कम कैदी अकाऊंटमधून त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.

 

मागे

निर्भयाच्या दोषींची अखेरची धडपड, काही तास उरले असताना फाशी टाळण्यासाठी पुन्हा याचिका
निर्भयाच्या दोषींची अखेरची धडपड, काही तास उरले असताना फाशी टाळण्यासाठी पुन्हा याचिका

निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरी....

अधिक वाचा

पुढे  

अखेर निर्भयाला आठ वर्षांनी मिळाला न्याय ,बलात्कार प्रकरणी चारही क्रूरकर्म्यांना फाशी
अखेर निर्भयाला आठ वर्षांनी मिळाला न्याय ,बलात्कार प्रकरणी चारही क्रूरकर्म्यांना फाशी

२०१२ मध्ये घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडिता 'निर्भया' ला तब्बल आ....

Read more