ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च

शहर : देश

       नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींना अखेर १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. निर्भयाचे चारही गुन्हेगार तिहार तुरुंगात कैद असून, त्यांच्या सुरक्षेवर दररोज जवळपास ५० हजार रुपये खर्च करण्यात येतो. कोर्टानं त्यांना फासावर लटकावण्यासाठी डेथ वॉरंट जारी केला, त्या दिवसापासून त्यांच्या सुरक्षेसाठी दररोज हजारो रुपये खर्च केले जात आहेत. कोठडीच्या बाहेर तैनात केलेले ३२ सुरक्षा रक्षक आणि फाशीच्या तयारीसाठी करण्यात येणारी कामे यांच्यावर हा खर्च केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना विश्रांती मिळावी यासाठी दर दोन तासाला ड्युटी बदलली जात आहे.


      मिळालेल्या माहितीनुसार, चौघाही जणांना तिहारमधील जेल क्रमांक ३ मध्ये वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या कोठडीबाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यातील एक हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलेला तामिळनाडू विशेष पोलीस दलातील कर्मचारी आणि एक तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकारी आहे.गुन्हेगाराच्या कोठडीबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची दर दोन तासाला ड्युटी बदलली जाते. त्यांना आराम दिला जातो.


          दरम्यान,  प्रत्येक कैद्यासाठी २४ तासांसाठी आठ-आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. म्हणजेच चार कैद्यांसाठी एकूण ३२ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ते २४ तासांत ४८ शिफ्टमध्ये काम करीत आहेत. डेथ वॉरंट जारी होण्याआधी त्यांना अन्य कैद्यांसोबत ठेवले जात होते. त्यांच्यासाठी स्वतंत्र कोठडी नव्हती. मात्र, डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करू नये किंवा तुरुंगातून पळून जाऊ नये म्हणून दर दोन तासांच्या शिफ्टमध्ये दोन सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे.
 

मागे

डॉ. अब्दुल रहमान यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
डॉ. अब्दुल रहमान यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

           मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. अब्दुल रहमान अंजारिया या....

अधिक वाचा

पुढे  

इंटरपोलची नित्यानंदविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी
इंटरपोलची नित्यानंदविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

         बंगळूर : अत्याचार, लैंगिक छळ, अपहरण, मानवी तस्करी आदी भयानक आरो....

Read more