ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भयाच्या आई-वडिलांच्या आशा उंचावल्या; अजून तरी प्रतीक्षाच

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भयाच्या आई-वडिलांच्या आशा उंचावल्या; अजून तरी प्रतीक्षाच

शहर : देश

             नवी दिल्ली –  ‘हैदराबाद चकमकीनंतर चार संशयितांना ठार मारण्यात आले त्यावर आनंदही साजरा केला गेला, खरेतर अशा प्रकरणातील आरोपींना काहीही शिक्षा झाली तरी त्यातून न्याय मिळाल्यासारखे नाही. लोकांनी आनंदोत्सव साजरा केला कारण न्यायाला नेहमीच विलंब होत असतो, पण हैदराबादमधील मुलीच्या प्रकरणात कुठेतरी तो वेळेत दिला गेला अशी लोकांची भावना होती, त्या वेळी मीही आनंद व्यक्त केला होता. अशी निर्भयची आई माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

 
            आमच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेला सात वर्षे होऊ नही अजून न्याय मिळालेला नाही. ‘या घटनेनंतर दिल्लीला बलात्काराची राजधानी संबोधले गेले. पण प्रत्यक्षात हा प्रश्न संपूर्ण भारतातच आहे, त्यामुळे आम्ही देशाच्या राजधानीबाबत द्वेष किंवा मत्सराची भावना ठेवलेली नाही,’ असे सांगून तिच्या आईने म्हटले आहे, की ‘खरेतर दिल्लीने आमचे सर्वस्व हिरावून घेतले पण तरी आम्ही दिल्लीचा द्वेष करीत नाही. 


            जगात तुम्ही कुठेही गेलात तरी अशा घटना घडतच असतात. त्यामुळे सगळ्या जगाचा तर द्वेष करता येणार नाही. पण आम्हाला परिस्थिती बदलावी अशी आशा वाटते. निर्भयावर अत्याचार करून खून करणारम्य़ा गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे आमच्या आशा उंचावल्या आहेत.’ त्यांच्या मृत्यूचे वॉरंट निघून फाशीची तारीख जाहीर करेपर्यंत तरी आम्हाला शांतता लाभणार नाही. 
 

मागे

88 किलो 250 ग्रॅम गांजा विक्रेत्याला पोलिसांनी सापळा रचून केली अटक
88 किलो 250 ग्रॅम गांजा विक्रेत्याला पोलिसांनी सापळा रचून केली अटक

नवी मुंबई – परिमंडळ उपायुक्तांच्या विशेष पथकाने वाशीतून 89 किलो गांजा जप्त....

अधिक वाचा

पुढे  

जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी चार जण दोषी
जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी चार जण दोषी

           जयपूर- राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 13 मे, 2008 रोजी सीरियल बॉम....

Read more