By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
वळती जवळ असलेल्या गांजवेवाडीत शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कौलारू घराला भीषण आग लागली. संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यात वृद्ध दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुक्ताजी भिवा गांजवे (95) आणि ठकुबाई मुक्ताजी गांजवे (85) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की, मुक्ताजी भिवा गांजवे यांच्या घराला आग लागली. मुक्ताजी आणि ठकुबाई होरपळले गेले. ठकुबाई यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मुक्ताजी यांना तातडीने मंचर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचाही मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी पोलीसानी पंचनामा केला असून घरामध्ये गॅस सिलिंडर असल्याने सुरवातीला बचाव कामात अनेक अडचणी आल्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
वैष्णवी सिटी हांडेवाडे रस्ता देवाची उरुळी येथे सासु-सासरे आणि नवरा यांच्या....
अधिक वाचा