By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : चंद्रपूर
चंद्रपूर - राजुरा वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगेश पैकन असे या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो राजुरा येथील इंदिरा नगरचा रविवासी आहे. राजुरा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १५५ मध्ये आज दुपारी हा हल्ला झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला असून या वाघाला ठार मारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्याच महिन्यात मूर्ती येथील श्रीहरी साळवे या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला होता. यात ते ठार झाले होते. त्यानंतर काही वेळात चिचबोली शिवारात वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. याच कारणामुळे महिन्यातील जोगापूर देवस्थान यात्रा महोत्सव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वन कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस गस्त घालणे सुरू केले आहे. त्यात वाघाची संख्या जास्त असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. त्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसले आहे.
पुणे - बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ मेट्रोचे काम सुरू असत....
अधिक वाचा