By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 11:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांनी शॉपिंगला सुरुवात केली असेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता बरेच जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहे. मात्र वसईमध्ये एका महिलेची ऑनलाईन शॉपिंगद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेने फेसबुक पेजवरुन साडेपाच हजाराचा ड्रेस मागवला होता. मात्र तिला रद्दीतील साड्या पार्सलमधून आल्या. महिलेने अजून पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद केली आहे.
वसईत राहणाऱ्या गीता गुप्ता यांनी एका फेसबुक पेजवर साडेपाच हजारांचा ड्रेस पाहिला, त्यांना तो आवडला. हा साडेपाच हजाराचा ड्रेस त्यांना डिस्काऊंटमध्ये 1300 रुपयात मिळेल, असे दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी तो ड्रेस डिलिव्हरी डॉट कॉमवरुन मागवला. दोन दिवसात त्यांना पार्सल आलं. पण आलेलं पार्सल त्यांनी उघडून बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यात त्यांना चक्क रद्दीतल्या, वापरलेल्या साड्या बॉक्समध्ये दिसल्या होत्या. हे पार्सल चुकून आलं असावे म्हणून त्यांनी दुसरी ऑर्डर केली तर दुसऱ्या ऑर्डरमध्येही तसंच. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं.
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी त्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गेल्या खऱ्या, पण तक्रार न देताच घरी परतल्या.
पण जर पुन्हा तक्रार दिली तर आम्ही ती नोंदवून तपास करणार असल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. तसंच स्टेशन डायरीत महिलेची नोंद केल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना सावध राहावं, असं आवहानही पोलिसांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, अशाप्रकारांमध्ये ग्राहकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट असल्याचा संशय गीता गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
युरोपातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी असलेल्या व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्....
अधिक वाचा