By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 02:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघे भाऊ मागील २१ ऑक्टोबरपासून फरार होते. या दोघा भावांवर १ हजार १५४ गुंतवणुकदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ठाणे पोलीस आयुक्त हद्दीतल्या डोंबिवली, नौपाडा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये या दोघांविरोधात गुन्हे दाखल आहेत.ठाणे पोलिसांनी गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाशी संबंधित मालमत्ताही जप्त केली आहे.
ठाण्यातील गडकरी सर्कल येथे असलेल्या गुडविन ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना १८ ते २० टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेतली. पोलिसांनी मालकांवर कलम ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
पीएमसी बँक गैरव्यवहारानंतर गुडविन ज्वेलर्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. जास्त पैसे मिळणार म्हणून काहींनी निवृत्तीचे पैसे तर कोणी आयुष्यभराची कमावलेली रक्कम या ठिकाणी गुंतवली होती. मात्र मुदत संपूनही त्यांचे व्याज आणि मूळ रक्कम मिळत नसल्याने काही जण जेव्हा पैशांची मागणी करायला गेले असता. दुकानाचे मालक पसार झाले होते.मोठया व्याजाला बळी पडून अशाप्रकारची गुंतवणूक करू नये, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आलं आहे.
आंध्रप्रदेश - विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं ‘द....
अधिक वाचा