By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. मात्र २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्याच कोठडीत असणार आहेत.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने पी चिदंबरम यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मिळते. जामिनानंतर ही चिदंबरम तिहाड जेलमध्ये राहणार आहेत. कारण 24 ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्या कोठडीत राहणार आहेत.
20 ऑगस्टला दिल्ली हायकोर्टाने पी चिदंबरम यांचा जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी मागितली होती. 21 ऑगस्टला सीबीआयने पी चिदंबरम यांना अटक केली होती. 22 ऑगस्टला सीबीआयने कोर्टात त्यांना हजर केलं. सीबीआयने कोर्टात 5 दिवसासाठी त्यांची कोठडी मागितली होती.
हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली....
अधिक वाचा