ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्र सरकारचा कर्मचारी, पाकिस्तानच्या ISI साठी करत होता काम, आर्मीचे सीक्रेट्स पाठवले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2024 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्र सरकारचा कर्मचारी, पाकिस्तानच्या ISI साठी करत होता काम, आर्मीचे सीक्रेट्स पाठवले

शहर : देश

मॉस्कोत कार्यरत असलेला परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचारी 2021 पासून आयएसआयला माहिती पुरवत होता. उत्तर प्रदेश एटीएसने त्याला अटक केली आहे. त्याने भारतीय लष्काराचे सीक्रेट्स आयएसआयला दिले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेला कर्मचारी पाकिस्तानला भारतीय लष्काराची माहिती देत होता. मॉस्कोत कार्यरत असलेला हा कर्मचारी 2021 पासून आयएसआयला माहिती पुरवत होता. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. मेरठमध्ये ही कारवाई करण्यात आली. सतेंद्र सिवाल नावाच्या या एजंटने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आयएसआय एजंट असलेला सतेंद्र हा मॉस्कोतील भारतीय दुतावासात इंडियन बेस्ड सिक्योरिटी असिस्टेंट (IBSA) पदावर कार्यरत होता.

एटीएसला इनपुट मिळाले अन्

आयएसआय एजंट झालेला सतेंद्र याच्यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसला इनपुट मिळाले होते. आयएसआय पराराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यास हनी ट्रॅप आणि पैशांचे आमिष देऊन माहिती घेत होती. त्यानंतर एटीएसने तपास सुरु केला. त्यात सतेंद्र सिवाल हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती देत असल्याचे समोर आले. त्याने भारतीय लष्काराची गुप्त माहिती पुरवली होती. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये राहणार सतेंद्र याची नियुक्ती मॉस्कोतील भारतीय दुतावासात करण्यात आली होती. त्याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले.

अनेक गोपणीय माहिती पाठवली

यूपी एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, सतेंद्र सिवालला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला आपण गोपनीय माहिती पाठवत असल्याचे त्याने मान्य केले.

आयएसआय हँडलर्स म्हणून काम करणारा सतेंद्र याने भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी संस्थेची महत्त्वाची गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप आहे. एटीएसच्या पथकाने त्याच्याकडून 2 मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. यूपी एटीएस अजूनही त्याची अधिक चौकशी करत आहे.

मागे

 आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप; कोर्टात काय काय घडलं?
आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप; कोर्टात काय काय घडलं?

भाजपचे नेते आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट शिंदे गटाचे माजी नगर....

अधिक वाचा

पुढे  

पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा लॉजमधून पोलिसांच्या ताब्यात! Video भोवला
पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा लॉजमधून पोलिसांच्या ताब्यात! Video भोवला

Pooja Khedkar Mother Arrest:  खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या आयएएस अधिका....

Read more