ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संसदेत चाकूसह प्रवेश करणार्‍या संशयित तरुणाला अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संसदेत चाकूसह प्रवेश करणार्‍या संशयित तरुणाला अटक

शहर : delhi

सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. असे असले तरी संसदेत कुणालाही प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत अचानक हातात चाकू घेतलेला एक तरुण संसदेत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाना दिसला. त्यांनी या तरुणाला तात्काळ रोखून ताब्यात घेतले.

संसदेत चाकूसह प्रवेश करणार्‍या या तरुणाचे नाव सागर इसा असल्याचे कळते. तो दिल्लीतील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.तसेच तो बाबा राम रहीमचा भक्त असल्याचे कळते. मात्र तो संसदेत चाकू घेवून कशासाठी आला होता? हे कळले नाही. या तरुणाची संसद पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.

 

 

मागे

कराडमध्ये कुख्यात गुंडाची हत्या
कराडमध्ये कुख्यात गुंडाची हत्या

कराडमधील कुख्यात गुंड पवन सोळवडे यांची अज्ञात व्यक्तीने नऊ दोन गोळ्या झाडू....

अधिक वाचा

पुढे  

काकतीमध्ये पबजीमुळे एकाचा खून
काकतीमध्ये पबजीमुळे एकाचा खून

रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोपायाला सांगि....

Read more