By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राकेश वाधनान याचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर आंदोलन केले. बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पीएमसी घोटाळा : कोट्यवधींची संपत्ती जप्त
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेशकुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.
२१ हजार ४९ खाती बनावट
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघडकीस येतायत. बँकेमध्ये २१ हजार ४९ खाती बनावट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या बँकांचे केवायसी करण्यात आलेलं नाही. केवळ एक्सेल शिटमध्ये या खात्यांची माहिती ठेवण्यात आलीये. २०१७पासून हा प्रकार सुरू असून बँकेतल्या केवळ ६ जणांनाच याची माहिती होती, असं आता उघड झाले आहे. ऑडिटर, ऑडिट कमिटी एवढंच नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळापासूनही ही बाब दडपण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी केली अटक
HDIL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान. मुंबईत प्रचंड ताकतवान झाले होते. इतके ती सगळ्यांनाच त्यांची दहशत वाटू लागली होती. लवकरच ईडीकडून त्यांचे काळे कारनामे उघड होतील अशी शक्यता आहे. अलिबागमधील २२ खोल्यांच्या अलिशान बंगला जप्त केला आहे. पीएमसी बँक अपहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल हे बाप-बेटे राकेश आणि सारंग वाधवान. ८०च्या दसकात वसई-विरारमध्ये त्यांनी रियल इस्टेटचा धंदा सुरु केला. त्यावेळी वसई-विरारवर भाई ठाकूर यांचा एकछत्री अंमल होता. याचा वाधवान कुटुंबाने पुरेपूर फायदा उलला. भाई ठाकूर यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्तापीत केले आणि त्यांच्या मदतीनेच रियल इस्टेटच्या धंद्यात पाऊल टाकल्याची बाब पुढे आली आहे. त्यानंतर ते अधिकाधीक बलशाली बनत गेले.
रविवारी रात्री भुसावळ येथे भाजप कार्यकर्त्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर....
अधिक वाचा