ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Pravin Raut | राऊतांच्या जवळच्या मानले गेलेल्या प्रवीण राऊतांची संपत्ती जप्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 07:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Pravin Raut | राऊतांच्या जवळच्या मानले गेलेल्या प्रवीण राऊतांची संपत्ती जप्त

शहर : मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी बँक घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती. या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात समन्स बजावले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

ईडीच्या रडारवर कोण?

पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वाधवान ग्रुपचा समावेश असलेल्या 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. याआधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांची मुलं विहंग-पूर्वेश सरनाईकही ईडीच्या रडारवर आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं.

काय आहे PMC बँक घोटाळा?

रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये एका व्हिसल-ब्लोअरच्या मदतीने पीएमसी बँकेने खोटे बँक खाते दाखवत एका रियल इस्टे डेव्हलोपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती मिळाली. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतून रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले.  हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

पीएमसी बँकेचे देशभरात 137 शाखा आहेत. विशेष म्हणजे या बँकेतील सर्वाधिक खातेदार हे मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिक होते. त्यामुळे त्यांना या घोटाळ्याचा मोठा फटका बसला.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत बऱ्याच जणांना अटक करण्यात आली आहे. ईडीने 16 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली होती. त्याआधी ईओडब्ल्यू बँकेचे माजी संचालक वरयाम सिंह, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रवर्तक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौकशीनंतर माजी संचालक सुरजीत सिंह अरोडा, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, बँकचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि माजी संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती. त्याशिवाय ऑडिटर जयेश संघानी, केतन लकडावाला यांनाही अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

याप्रकरणी ईडीने मोठमोठ्या धाडी टाकल्या होत्या. या धाडीत ईडीला घबाड सापडलं होत. ईडीला अलिबागमध्ये तब्बल 22 फ्लॅट सापडले असून यातील लॅविश फ्लॅटचा ईडीने ताबा घेतला होता. हे कमी म्हणून की काय ईडीला एचडीआयएलच्या प्रमोटर्सच्या नावावर एक विमान असल्याचं आढळलं होतं. त्याचबरोबर एक छोटं जहाजही सापडलं होतं. 

मागे

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!
मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

एकीकडे संपूर्ण भारतात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना, दुसरीकडे मुंब....

अधिक वाचा

पुढे  

खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’
खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या किशोरवयीन तरुणीच्या हत्याकांडाने ....

Read more