By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 06:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
विरार : विरारच्या पश्चिम भागात म्हाडा कॉलनीमध्ये कुत्र्याच्या आठ पिल्लांना विष देऊन मारल्याची हृदयदायक घटना उघड झाली आहे. इतर २२ कुत्र्याच्या पिल्लांना झाडा-झुडुपांत फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी तीन जणांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी २९ जानेवारीला कुणाल घाटे या व्यक्तीने भारतीय पशु कल्याण मंडळाच्या पालघर जिल्हा अधिकारी मितेश जैन यांना घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरुन मितेश जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत असतांना तिथे त्यांना कुत्र्याची आठ पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. या पिल्लांपैकी तीन पिल्ले जखमी अवस्थेत त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ विरार येथील करूणा ट्रस्टच्या डॉक्टरांना बोलावून त्या जखमी पिल्लांवर उपचार करण्यात आले.
मितेश जैन आणि त्यांच्या डॉक्टरने तेथील सफाई कर्मचारी आणि वॉचमनला या प्रकरणाबाबत विचारपूस दरम्यान, म्हाडा कॉलनीतील एका शिक्षकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसात भोला शास्त्री (सफाई कामगार), पप्पू पासवान (वॉचमन), रवी वर्मा (वॉचमन) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशात फरुखाबादमध्ये एनएसजी कमांडोंनी आरोपी सु....
अधिक वाचा