ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकास मारहाण प्रकरणी दोघा भावांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकास मारहाण प्रकरणी  दोघा भावांना अटक

शहर : पुणे

वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा राग मनात धरून दोन सख्ख्या भावांनी पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यातच मारहाणीचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. २२ रोजी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्लू नागेंद्र डुबे ( वय २५) व सोनू नागेंद्र डुबे ( वय २१, दोघेही रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी, पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चाकण पोलिसांनी चौकशीसाठी नागेंद्र डुबे यांना आणले होते. यावरुन नागेंद्र यांची मुले कल्लू व सोनू हे दोघे पोलीस ठाण्यात आले. आमच्या वडीलांना पोलीस ठाण्यात का घेऊन आलात”, तुला माहीत नाही का आम्ही कोण आहे, असे म्हणून दाेघे उपनिरीक्षक कठोरे यांच्या अंगाावर धावून गेले आणि हातावर जोरात फटका मारला. तसेच त्यांना धक्का देऊन खाली पाडत लाथा बुक्याने मारून शिवीगाळ करत दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा, मारहाण केल्या प्रकरणी शनिवारी ( दि. २३ ) पहाटे पाचच्या सुमारास गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

मागे

इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य,14 कोटी पौंड किमतीच्या सोन्याची चोरी
इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य,14 कोटी पौंड किमतीच्या सोन्याची चोरी

इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य करण्यात येत असून गेल्या पाच व....

अधिक वाचा

पुढे  

भावाने केली बहिणीच्या नवर्‍याची हत्या
भावाने केली बहिणीच्या नवर्‍याची हत्या

पुणे - बहिणीने प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने तिच्या पतीच....

Read more