By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 06, 2021 08:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई शहरात चित्रपटात नशीब आजमवण्यासाठी तरुण तरुणी स्वप्न घेऊन येत असतात, बाहेरुन चंदेरी वाटणारी ही दुनिया आतून किती भयानक आहे, प्रत्येक पाऊल किती सांभाळू या जगात टाकावं लागतं, याची कल्पना तुम्हाला ही बातमी वाचल्यानंतर येईल. सुरूवातीला वेब सिरिज, शॉर्ट फिल्ममध्ये तुम्हाला काम देतो. यानंतर तुम्हाला पुढे मोठ्या ऑफर मिळतील असं दिवा स्वप्न दाखवून या तरुणींना फसवण्यात आल्याचा आरोप आहे.
वेब सिरिज शॉर्टफिल्मच्या नावाखाली या तरूणींचे अश्लील व्हिडीओ काढून घेण्यात आले. फसवून पॉर्नफिल्म काढणाऱ्या एका प्रॉडक्शन कंपनीचा पर्दाफाश करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं आहे. मढ बिचवरील एका बंगल्यावर धाड टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या पॉर्न व्हिडीओचा वापर करुन मोबाईल ऍपच्या मदतीने पॉर्नफिल्मचा व्यवसाय करणाऱ्या २ अभिनेत्यांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २ महिलांचा समावेश असून त्या बॉलीवूडशी संबंधित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
बॉलीवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची काही कमी नाही. या तरूण तरूणींचा फायदा घेत पॉर्न व्हीडिओ बनवले जात असल्याचं गुन्हे शाखेला समजलं. उपनगरात अनेक ठिकाणी बंगले भाड्याने घेऊन हे अश्लील उद्योग सुरू होते, यात बॉलीवूडशी संबंधित काही लोक असल्याचंही पोलिसांना समजलं. ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती.
पोलिसांच्या पथकाने जेव्हा मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी पलंगावर एक अश्लील शूटिंग सुरु होतं. पोलिसांनी हे काम करणाऱ्या ५ जणांना जागेवर अटक केली. यात २ अभिनेता, एक ग्राफिक्स डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामनचा देखील समावेश आहे.
भंडार्याच्या भीषण आग दुर्घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईत क....
अधिक वाचा