By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
एका ब्रिटीश महिलेला पूर्वाश्रमीच्या नवर्याच्या बायकोला घोडी बोलणं चांगलच महागात पडलं आहे. तिला दुबईतील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लालेह शाहर्वरेश (55) असे तिचे नाव आहे. लालेह ही मूळची ब्रिटीश असून तिने दुबईतील एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगीही झाली. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर अचानक त्यांच्यात पटेनासे झाले व त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर लालेह मुलीला घेऊन कायमची ब्रिटनला निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिने फेसबुकवर नवर्याचे एक महिलेसोबतचे फोटो बघितले. त्यात त्याने ती आपली बायको असल्याचे बोलला आहे. नवर्याच्या दुसर्या बायकोला पाहताच लालेहचा तिळपापड झाला आणि तिने त्या फोटोखाली तू खड्ड्यात जाशील अशी आशा करते असे म्हणत या घोडीसाठी तू मला सोडून गेलास अशी कमेंट केली. हे नवर्याच्या दुसर्या बायकोला कळताच तिने दुबई पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली. मात्र काही दिवसांपूर्वी लालेहच्या नवर्याचे निधन झाले. त्यावेळी त्याला शेवटचं पाहण्यासाठी ती दुबईला आली असता पोलिसांनी तिला अटक करत येथील न्यायालयासमोर उभे केले. त्यावेळी न्यायालयाने तिला अवमानकारक कमेंटसाठी पन्नास हजार दिनार व दोन वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली.
उरण तालुक्यातील जासई येथे राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या मामानेच ....
अधिक वाचा