ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2020 10:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

शहर : मुंबई

का डॉक्टरच्या निष्काळजीपणा तरुणीच्या चक्क जीवावर बेतलं आहे. आरोप असा आहे की, डॉक्टरने २१ वर्षीय तरुणीच्या ऑपरेशन दरम्यान पोटात टॉवेल विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराने परिसरात डॉक्टरच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

मीरा देवी नावाच्या महिलेला प्रसूतीचा त्रास होऊ लागला. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २९ जुलै रोजी डॉक्टरांनी महिलेचं ऑपरेशन केलं. यानंतर महिलेचा त्रास कमी होण्यापेक्षा अधिक वाढला. ऑपरेशननंतर तिला सतत त्रास होऊ लागला. यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ऑपरेशन केलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण महिलेच्या पोटात टॉवेल राहिल्याचं निदर्शनास आलं. या टॉवेलचा उपयोग डॉक्टर ऑपरेशन दरम्यान करतात.

महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मीरा देवीची पहिली प्रसूती होती. यासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २९ जुलै रोजी डॉक्टरने ऑपरेशन केलं. मात्र ऑपरेशननंतर तिचं पुन्हा पोट दुखू लागलं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेची प्रकृती नाजूक आहे. तिला सतत रक्त चढवावं लागत आहे. डॉक्टरांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मागे

महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सोमवारी सायंकाळच्या सुमारास  महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घ....

अधिक वाचा

पुढे  

कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, वाहतुकीसाठी अनोख्या क्लुप्त्या
कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, वाहतुकीसाठी अनोख्या क्लुप्त्या

गुटखा बंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटक्याची विक्री सर्रास ....

Read more