By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 04:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा बहिणीच्या छेडछाडीला विरोध करणार्या भावाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात ३०२, ३२३ आणि ५०४ या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी त्या मुलीला त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला होता. मात्र त्या तरूणाचा त्रास काही थांबला नाही. याबद्दल सदर मुलीच्या भावाने त्या तरुणाला अनेकदा सांगून पाहिले आणि दमही दिला होता. याचा राग त्या तरुणाला आला. राग मनात ठेऊन धार-धार शस्त्रांनी वार करून आरोपीने मुलीच्या भावाची हत्या केली.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधातले खटले वेगाने निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन असे प्रकार करणाऱ्यांना जबर शिक्षा व्हावी, यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. महिला व बालकांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असून अशा प्रकरणांमधील आरोपींना वेळेत आणि कठोर शिक्षा झाल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, असा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याच आ....
अधिक वाचा