By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 17, 2021 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार असून यांची पूजा चव्हाण हत्याप्रकरणात काय भूमिका आहे? याचा तपास पोलीस करणार आहेत. (pune police arrested two person in Pooja Chavan Suicide Case)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर 11 दिवसानंतर पोलिसांनी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधील हे दोघे नसतील तर अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत? असा सवालही केला जात आहे.
औरंगाबाद (Aurangabad Crime) जवळच्या पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Husband Murdered His W....
अधिक वाचा