ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘गोल्डन गुस’ बारवर पोलिसांची धडक कारवाई

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘गोल्डन गुस’ बारवर पोलिसांची धडक कारवाई

शहर : मुंबई

निवडणूकीच्या काळात शहरामध्ये कुठेही दारू किंवा अन्य माध्यमातून नागरिकांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या. या कारवाईमध्ये शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने ग्रँट रोड येथील बारवर कारवाई करून आठ बारबालांची  करण्यात आली. ग्रँट रोड रेल्वे स्थानकाबाहेर स्लॅटर मार्गावर ‘गोल्डन गुस’ बार असून तेथे एकाच वेळी मोठया संख्येने बारबाला असतात. शिवाय तेथे तळीरामांची संख्यादेखील वाढत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे येत होत्या. याची दखल घेऊन गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपायुक्ताने शुक्रवारी रात्री त्या बारवर छापा टाकला. त्यावेळेस तेथे 31 ग्राहक आणि 8 बारबाला सापडल्या. तसेच बारमधून 91 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. अंधेरीतील ‘सरोज’ बारवर धडक कारवाई केल्यानंतर शुक्रवारी ग्रँट रोडच्या ‘गोल्डन गुस’ बारवर कारवाई करण्यात आली.

मागे

राज्याच्या उपराजधानीत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या
राज्याच्या उपराजधानीत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या

राज्याची उपराजधानी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

99 ऐवजी दिले 0 गुण दिले म्हणून 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या
99 ऐवजी दिले 0 गुण दिले म्हणून 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या

तेलंगणातील 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात 21 विद्यार्थ्यांन....

Read more