By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : baramati
शहरातील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.28) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, शहरातील एका माध्यमिक विद्यालयामधील स्वच्छतागृहामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी शाळेतील दोघा आरोपी विद्यार्थ्यांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबांधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने बुधवारी 1 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . पिडीत अल्पवयीन मुलगी त्याच शाळेत शिक्षण घेत आहे. या हायस्कूलमध्ये हे आरोपी विद्यार्थीही शिकतात. ते या मुलीच्या ओळखीचे आहेत. यापैकी एकाने हायस्कूलच्या आवारातील स्वच्छतागृहामध्ये या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तर या आरोपीला अन्य एका विद्यार्थ्याने मदत केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी शेंडगे करत आहेत .
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी ठरल....
अधिक वाचा