ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल

शहर : मुंबई

उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना राज्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

 

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय पीडित महिलेची ओळख शेजारी राहणाऱ्या फय्याज शेखसोबत झाली होती. जून 2018 मध्ये फय्याजने महिलेला घरी बोलवलं होतं आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी फय्याजने महिलेचा व्हिडिओ तयार केला आणि तो मित्र सादिक पटेलच्या मोबाईलवर शेअर केला.यानंतर सादिक पटेल यानेही महिलेला व्हिडिओ दाखवून धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं आणि बलात्कार केला. त्यानंतर दोघांनीही त्यांचा तिसरा मित्र नदीमला व्हिडिओ पाठवला आणि त्यानेही पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. अखेर पीडित महिलेनं महत्त्वाची भूमिका घेत दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून कलम 376 (2) एन, 354, 345 डी, 506 (2) आयटी अ‍ॅक्टसहित 66 ई अंतर्गत गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी दिंडोशी पोलिसांनी फय्याज शेख आणि सादिक पटेल या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांचा मित्र नदीम अद्याप फरार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरनेंद्र कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, नवी मुंबईतूनही बलात्काराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई शहरात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका 25 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा त्याची पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलासह नेरुळ गावात राहत असून पीडित मुलगी त्याच्या घराशेजारी राहत होती.

     

मागे

अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्यांना लोकल प्रवासासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देणारा अटकेत
अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्यांना लोकल प्रवासासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देणारा अटकेत

रेल्वे पोलिसांनी एका अशा इसमाला अटक केली आहे, जो लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस अत्याचार : बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ
हाथरस अत्याचार : बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ

हाथरस सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गा....

Read more