By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पैशांच्या वसुलीसाठी सावकारानं नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आलीय. यासंबंधी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पीडित नवविवाहीत तरुणी ही सुशिक्षित असून तिनं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलंय. कर्जाऊ रक्कमेची वसुली करण्यासाठी सावकारानं संबंधित कुटुंबावर दबाव आणला होता. यासाठी पीडित तरुणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाणही करण्यात आल्याचं उघड झालंय. संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करून सावकारानं तिच्यावर बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलंय.
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही घटना उघड झालीय. पोलिसांनी या सावकाराचं नाव आत्ताच उघड करण्यास नकार दिलाय. या प्रकरणात सावकाराला आणखी दोन व्यक्तींनीही मदत केली. या दोघांचा शोध सुरू आहे.
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयातील एका माजी कर्मचारी ....
अधिक वाचा