ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

शहर : देश

शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असून या चौकशीत पोलिसांना लाल किल्ल्यात पोहोचण्याचं प्लानिंगच सांगितलं. तसेच आपला कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचं समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असं सांगतानाच केवळ भावनेच्या भरात आपण शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)

सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईचं धोरण घेत होते, असा माझा संशय होता, असं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झालं आणि मी त्याकडे आकर्षित झालो, असंही तो म्हणाला.

स्वयंसेवकांचे जॅकेट चोरले

यावेळी त्याने लाल किल्ल्यात पोहोचण्याचा प्लान कसा तयार केला, याची माहितीच पोलिसांना दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी गेल्यावर तिथे त्याला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसला. त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजी तो दिल्लीत दाखल झाला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यामुळे त्याने स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले.

लाल किल्ल्यावर जातानाच शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा आमचा प्लान होता. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी जुगराज सिंगला खास बोलावण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोटही त्याने केला.

सुखविंदर सिंगला अटक

सुखविंदर सिंग हा सुद्धा या आंदोलनात सरहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. 2 फेब्रुवारी रोजी गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. तसेच 6 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.

लक्खा सिधाना सिंधु बॉर्डरवर?

या प्रकरणातील दुसरा आरोपी लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत असल्याने त्याला पकडणे मुश्किल झालं आहे. तसेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये आल्याचं दिसून आलं होतं. आता त्याचं लोकेशन सिंधु बॉर्डर दाखवली जात आहे. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway)

 

मागे

Deep Siddhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक
Deep Siddhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक ....

अधिक वाचा

पुढे  

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार
आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संत....

Read more