By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना कोर्टाना झटका दिला आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉबर्ट वाड्रा यांना कोर्टाने अमेरिका आणि नेदरलँडला जाण्याची परवानगी दिली आहे. पण कोर्टाने त्यांना लंडनला जाण्याची परवानगी दिली नाही.
कोर्टाने म्हटलं की, रॉबर्ट वाड्रा 6 आठवड्यांसाठी परदेशात जावू शकतात. पण या 6 आठवड्यात जर लुकआउट नोटीस जारी झाली तर या कालावधीत ती निलंबित राहिल. असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांची प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाच्या मागच्या सुनावणीनंतर ईडीने वाड्रा यांना समन्स पाठवला होता. पण ते हजर झाले नव्हते.
मंगळवारी वाड्रांना ईडीसमोर हजर राहायचं आहे. त्य़ांची कसून चौकशी होऊ शकते. रॉबर्ट वाड्रा यांचा पासपोर्ट अजूनही कोर्टात जमा आहे. मेडिकल सर्टिफिकेट देत त्यांनी पासपोर्ट रिलीज करण्याची मागणी केली आहे. ईडीने मात्र याला विरोध केला आहे. रॉबर्ट वाड्राने त्यांच्या मोठ्या आतड्यात ट्यूमर असल्याचं म्हटलं आहे.
रॉबर्ट वाड्रा सध्य़ा जामिनावर बाहेर आहेत. रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीमध्ये लंडन येथील 12 ब्रायनस्टन स्क्वॉयरमध्ये 19 लाख पाउंडची संपत्ती विकत घेताना मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ही संपत्ती वाड्रा यांची असल्याचा आरोप आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तिन्ह....
अधिक वाचा