By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 05:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
रोहितच्या हत्ये प्रकरणातील दिवसेंदिवस नवीन पुरावे समोर येत आहेत. रोहित तिवारीची पत्नी अपूर्वानं गुन्हा कबुल केला असून सध्या अपूर्वा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. रोहितची हत्या केल्यानंतर अपूर्वानं सारं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. अपूर्वाची मोबाईल हिस्ट्री चेक केल्यानंतर सर्व खुलासे होत आहेत. पोलिसांना या सार्या प्रकरणांचा सुगावा लागू नये म्हणून अपूर्वानं व्हॉट्सअॅप चाट डिलीट करण्याचा प्रयत्न केला. परंतु या सार्या गोष्टी आता समोर आल्या आहेत.
रोहितची हत्या केल्यानंतर तपासाअंती अपूर्वा रोहितच्या मित्रांसोबत व्हॉट्सअॅप चाट करत होती. रोहितचा मृत्यू हा हार्ट अटॅकनं झाला असं भासवण्याचा ती प्रयत्न करत होती. अपूर्वानं सर्व गोष्टी पोलिसांपासून लपवण्यासाठी मोबाईल पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी फॉरमॅट केला होता. शिवाय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची चाट हिस्ट्री देखील डिलीट केली.
विश्वचषकासाठी निवड झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयुष्या....
अधिक वाचा