By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 11:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
विटाजवळ गारदी येथे 12 ओक्तोंबर 2012 रोजी एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करणार्या तिचा प्रियकर लक्ष्य उर्फ लक्ष्मण सरगर,अनुज अर्जुन पवार आणि दादासो भास्कर आठवले या तिघा नराधमाना जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या तिघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा गळा दाबून खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्या तरुणीचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची कबुली लक्ष्मण सरगरणे दिली होती.
या प्रकरणी विटा पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकरासह तिघा नराधमाना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या खटल्याची अंतिम सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात काल पार पडली . यामध्ये सरकारी पक्षाने एकूण 20 साक्षीदारांचा जबाब नोंद घेत वकील उल्हास चिप्रे यांनी संबंधित घटना कोपरडी प्रमाणेच गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिल आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तर परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपींनी बलात्कार करून खून केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 7 वर्षाचा सश्रम कारावास आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार प्रमाणे एकूण 75 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे कार च....
अधिक वाचा