By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
अहमदनगर - देशात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही या घटनेविरुद्ध कुठेही कठोर कारवाई केली जात असल्याचा निदर्शनात येत नाही. एकीकडे नागरिक आता हैदराबाद येथील एन्काऊंटर बाजू घेऊन त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. पण 2013 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या बाबतीत अजूनही आरोपी जेलमध्येच आहेत. यासाठीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी परत एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असुन ते येत्या 20 डिसेंबरपासून मौनव्रत आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, ज्या लोकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा देशांमध्ये नागरिकांमध्ये असंतोष होईल. आणि अराजकता माजू शकते अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलीये. सरकारने याबाबत कठोर पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन पुढे अनिश्चित काळापर्यंत सुरु राहिल, असे देखील अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.
दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील नराधमांना कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. सुत....
अधिक वाचा