ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या

शहर : ठाणे

       

         ठाण्यामध्ये भिवंडी परिसरात एका सात वर्षीय चिमूरडीवर बलात्कार करून दगडाने ठेचून  हत्या केल्याची संतापजनक घटना  घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या रहिवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भोईवाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी आरोपी भरतकुमार धनीराम कोरी याला अवघ्या दहा तासांत अटक केली.

        शनिवार २१ डिसेंबर रात्रीच्या सुमारात लहान मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली असताना, ती चिमूरडी अचानकपणे बेपत्ता झाली. कुटुंबियांनी सगळीकडे शोध घेवूनही ती मुलगी सापडली नाही. रविवारी सकाळच्या सुमारात गावातल्या एका व्यक्तीने घराच्या जवळच मोकळ्या जागेत झाडी-झुडपामध्ये मृतदेह आढळल्याची माहिती लोकांना दिली.

        भोईवाडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्वरित पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या पहिल्या निकालात मुलीवर आत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे.

मागे

अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

             विवाहजुळणी संकेतस्थळावरून तपशील घेत शहरातील ‘आरजे’ (....

अधिक वाचा

पुढे  

बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी
बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी

         बीड - औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिक....

Read more