ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2020 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

शहर : मुंबई

मुंबईच्या (Mumbai) गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापाराचं (Sex Racket) मोठं रॅकेट उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 3 मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते डिलर्सलासुद्धा भेटले.

सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. जीच्यावर मोठ्या हॉटेल्समध्ये देह व्यापारासाठी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचा आरोप आहे.

बॉलिवूडच्या एका आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आणि दोन टीव्ही मालिका करणाऱ्या अभिनेत्रींवर या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसाठी 10 लाखांची डिल केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकून सेक्ट रॅकेट उधळून लावण्यात आलं आहे.

पुढे  

पाकिस्तानात मदरशात बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू तर ७० जखमी
पाकिस्तानात मदरशात बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू तर ७० जखमी

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील मदरशात हा ....

Read more