ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मामानेच केला ९ वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मामानेच केला ९ वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

शहर : uran

उरण तालुक्यातील जासई येथे राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या मामानेच लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उरण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  महेश भिमा भिडे (१८) असे आरोपीचे नाव आहे. त्याला नवी मुंबई येथील डॉ डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नाही.

बालिका घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने या बालिकेचे हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच या बाबत कुठे वाच्च्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. काही वेळाने या बालिकेचे आई घरात आली असता ही बालिका बेशुद्ध पडल्याचे दिसले. शुद्धीवर आल्यानंतर या बालिकेने सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर या बाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अतुल अहिर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आरोपी महेश भिमा भिडे यांच्या विरोधात भा.दं.वि. ३७६, ३७७, ५०६ आणि  पोक्सो २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पिडित मूलीचा मामा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून सर्व नागरिकांमधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मागे

९ वर्षाच्या बेपत्ता  विद्यार्थिनीचा  मृतदेहआढळला
९ वर्षाच्या बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेहआढळला

मुंबई महापालिकेच्या मणीलाल सुंदरजी तामीळ शाळेची विद्यार्थिनी काही दिवसां....

अधिक वाचा

पुढे  

पूर्वाश्रमीच्या नवर्‍याच्या बायकोला घोडी बोलणे पडलं महागात
पूर्वाश्रमीच्या नवर्‍याच्या बायकोला घोडी बोलणे पडलं महागात

एका ब्रिटीश महिलेला पूर्वाश्रमीच्या नवर्‍याच्या बायकोला घोडी बोलणं चांग....

Read more