By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 05:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही मावस भाऊ-बहिण होते. या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. मात्र त्यांच्या या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळेच या दोघांनी टोकाचे पाऊल उचलले.
दिल्लीतील आऊटर नॉर्थ विभागाचे पोलीस उपायुक्त गौरव शर्मा यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली. पोलिसांना एका व्यक्तीने फोन करुन आमच्या बाजूच्या खोलीमध्ये दोघांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना दोघांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळून आले.
त्यांना तेथे एक चिठ्ठीही मिळाली. “आमच्या घरचे आमच्या लग्नाला परवानगणी देत नसल्याने आम्ही दोघे दु:खी आणि कंटाळलो आहोत. त्यांना कुटुंब आणि प्रतिष्ठेचा विचार करत आहेत, मात्र आम्हाला स्वत:ची जास्त चिंता आहे. त्यामुळेच आम्ही हा आत्महत्येचा निर्णय घेत आहोत,” असं या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे.
पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा एक मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला होता तर दुसरा घराच्या छताला असणाऱ्या हुकाला दोरीच्या सहाय्याने लटकलेला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवर दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांना सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या घातपाताचा संक्षय व्यक्त केलेला नाही.
आत्महत्या केलेला तरुण हा २१ वर्षांचा असून तो मूळचा राजस्थानमधील कोट्टा येथील रहिवाशी आहे. सध्या तो इंजिनियरिंगच्या प्रवेश परिक्षेची तयारी करत होता. या मुलाचे आणि त्याच्या चुलत बहिणीचे प्रेमसंबंध होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोघांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र घरच्यांनी यांना रंगेहाथ पकडलं होतं.
मुलीच्या चुलत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नात्याने चुलत भाऊ असणारा हा तरुण नेहमी या मुलीला भेटण्यासाठी दिल्लीला यायचा. तो वारंवार दिल्लीला येऊ लागल्यानंतर आम्हाला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यावेळी आम्ही चौकशी केली असता या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्यांच्या नात्याबद्दल ऐकून आम्हा सर्वांना धक्काच बसला.
आम्ही दोघांनाही हे नातं अयोग्य असून पुढे काहीच होऊ शकत नाही, असा सल्ला या दोघांना देत एकमेकांपासून वेगळं होण्यास सांगितलं.” या तरुणाला दिल्लीतील नातेवाईकांनी कोट्टाला परत जाण्यास सांगितले. मात्र सोमवारी घरातील सर्व लोक काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे हा तरुण मुलीच्या घरी आला आणि तेथेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाटणा - बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी ....
अधिक वाचा