ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपुरात शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपुरात शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

शहर : नागपूर

         

             नागपुर - नागपूरात शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.  तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

      
        काल रात्री बारमध्ये बसलेला संजय खडसे आणि त्याच्या बाजूच्या टेबलवर बसलेला आरोपी या दोघांमध्ये ग्लास पडल्याच्या प्रक्रियेतून वाद निर्माण झाला. या वादातून जेव्हा संजय बारच्या बाहेर आला, तेव्हा आरोपींनी संजयवर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली.  

 
             नागपूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. हे हत्याकांडात राजकीय कट-कारसस्थान आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. 


 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 


         नागपूरसह अन्य सहा जिल्हा परिषद आणि पचायत समितींची निवडणूक होत असून आज मंगळवारी मतदान होत आहे. तसेच उद्या या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

        नागपूरात जिल्हा परिषदेच्या ५८ गटातील २७० उमेदवार राजकीय रिंगणात आहेत. तर १३ पंचायत समित्यांच्या ११६ गणासाठी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदमध्ये जितकी गरज भाजपला आहे, तितकीच राष्ट्रवादीला आपलं अस्तित्व टिकवण्याची गरज आहे.    
 

मागे

 सासरच्या कुटुंबियांविरुद्ध सुनेने केला गुन्हा दाखल
सासरच्या कुटुंबियांविरुद्ध सुनेने केला गुन्हा दाखल

        पिंपरी - पिंपरी परिसरातील चिखली भागात राहणार्या सासरच्या कुटु....

अधिक वाचा

पुढे  

जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर
जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर

            नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटन....

Read more