By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2019 10:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील विक्रोळी परिसरात आज पहाटे सव्वासातच्या दरम्यान शिवसेना उपविभागप्रमुख "चंद्रशेखर जाधव" यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ते नेहमीप्रमाणे टागोरनगर येथे असलेल्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परंतु मंदिराच्या बाहेर आल्यावर काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन वेळा फायरिंग केल्याने त्यांच्या डाव्या खांद्यावर एक गोळी लागली. या गोळीबारामध्ये चंद्रशेखर जाधव गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना त्वरित जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चंद्रशेखर जाधव यांच्यावर हल्ला का करण्यात आला? जाधव यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की, काही दिवसापासून हल्लेखोरांच्या धमक्या मिळत होत्या. त्यातूनच हा हल्ला करण्यात आला असेल का? याचा तपास पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह करत आहेत.
जाधवांवर हल्ला केल्यानंतर काही स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडून सर्व शस्त्र जप्त करण्यात आली. जाधव यांच्यावर हल्ला का झाला असेल ते अजूनपर्यंत काही समजले नाही.
जयपूर- राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 13 मे, 2008 रोजी सीरियल बॉम....
अधिक वाचा